डॉ. रईश मनीआर गुजरातीतले प्रतिष्ठित गझलकार व गझल अभ्यासक आहेत. गझलांमध्ये कोणती वृत्ते किती प्रमाणात वापरले जातात हे जाणून घेण्यासाठी त्यांनी 346 गुजराती आणि 437 उर्दू गझलांचे अशा 783 गझलांची वृत्ते तपासली. त्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढता येतो की 95% पेक्षा जास्त गझलांमध्ये फक्त 31 वृत्ते वापरली गेली आहेत. ह्या वृत्तांना भारतीय मात्रावृत्तांप्रमाणे पंचकल, षट्कल, सप्तकल आणि अष्टकल अशा प्रकारे विभाजित करून त्यांच्या 'गझलनुं छंदोविधान' पुस्तकात समाविष्ट केले आहे. त्यांच्या पुस्तकाच्या 'छंदनिरूपण' ह्या प्रकरणाचे संक्षिप्त भाषांतर खालील प्रमाणे आहे.
पंचकल वृत्तः
1) लगागा X 4
2) लगागा लगागा लगागा लगा
3) लगागा X 8
4) गालगा X 4
5) गालगा X 6
6) गालगा X 8
7) गालगा गालगा गालगागा X 2
षट्कल वृत्तः
8) गालगा गाललगा गाललगा गागागा(गाललगा)
9) गा गालगाल गाललगा गालगाल गा
10) गा गाललगा गाललगा गाललगा गा
11) लगाल गाललगा गालगाल गागागा(गाललगा)
12) गालगा गालगाल गागागा(गाललगा)
13) गालगा गाललगा गाललगा(गागागा)
14) गा गाललगा लगालगा गा
15) गा गालगाल गागा X 2
16) गालगाल गागागा X 2
17) गा गाललगा गागा X 2
18) लगालगा X 4
19) लल गालगाल गागा X 2
20) गाललगा लगालगा X 2
सप्तकल वृत्तः
21) गालगागा गालगागा गालगा
22) गालगागा गालगागा गालगागा गालगा
23) गागालगा X 4
24) लगागागा X 4
25) लगागागा लगागागा लगागा
26) ललगालगा X 4
अष्टकल वृत्तः
27) गा गाललगागा(गागागागा) गागागा X 2
28) गागागागा गागागागा गागागागा गागागा (गागागागा ऐवजी गाललगागा चालतं)
29) गा गाललगागा गागागा
30) गागागागा X 2
31) लगालगागा X 4
वरील 31 वृत्तांचे वजन,प्रचलन(वृत्ते आढळण्याचे प्रतिशत प्रमाण)
आणि उदाहरणे खालीलप्रमाणे-
पंचकल वृत्तः
1) लगागा X 4
प्रचलनः गुजराती 4.3, उर्दू 2.3, एकुण 3.3
उदाहरणः
* अकेले अकेले कहां जा रहे हो
* जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना
2) लगागा लगागा लगागा लगा
प्रचलनः गुजराती 1.7, उर्दू 1.7, एकुण 1.7
उदाहरणः
* दिखाई देये यूँ कि बेखुद किया
* बहारोने मेरा चमन लूटकर
3) लगागा X 8
प्रचलनः गुजराती 1.9, उर्दू -, एकुण 0.9
उदाहरणः
* हमें और जीनेकी चाहत न होती अगर तुम न होते अगर तुम न होते
4) गालगा X 4
प्रचलनः गुजराती 0.6, उर्दू 2.5, एकुण 1.6
उदाहरणः
* कर चले हम फिदा जानोतन साथीयो
* खुश रहे तु सदा ये दुआ है मेरी
5) गालगा X 6
प्रचलनः गुजराती -, उर्दू -, एकुण-
उदाहरणः
6) गालगा X 8
प्रचलनः गुजराती 0.6, उर्दू 0.7, एकुण 0.7
उदाहरणः
* धीरे धीरे कलाई लगे थामने उनको उंगली थमाना गज़ब हो गया
7) गालगा गालगा गालगागा X 2
प्रचलनः गुजराती -, उर्दू -, एकुण -
उदाहरणः
* बेवफा यूँ तेरा मुस्कुराना, प्यार करने के काबिल नहिं है
षट्कल वृत्तः
8) गालगा गाललगा गाललगा गागागा(गाललगा)
प्रचलनः गुजराती 2.0, उर्दू 9.7, एकुण 5.8
उदाहरणः
* फिर वही शाम वही गम वही तनहाई है
* ज़िन्दगी प्यार की दो चार घडी होती है
9) गा गालगाल गाललगा गालगाल गा
प्रचलनः गुजराती 30.7, उर्दू 19.4, एकुण 25.1
उदाहरणः
* मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
* मिलती है ज़िंदगीमें मुहब्बत कभी कभी
10) गा गाललगा गाललगा गाललगा गा
प्रचलनः गुजराती 1.9, उर्दू 4.2, एकुण 3.0
उदाहरणः
* सीने में जलन आँखमें तुफान सा क्यूँ है
* दुनियामें हूँ दुनियाका तलबगार नहीं हूँ
11) लगाल गाललगा गालगाल गागागा(गाललगा)
प्रचलनः गुजराती 10.7, उर्दू 9.1, एकुण 9.9
उदाहरणः
* ज़ुबांपे दर्दभरी दास्तां चली आई
* कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है
12) गालगा गालगाल गागागा(गाललगा)
प्रचलनः गुजराती 3.5, उर्दू 9.6, एकुण 6.5
उदाहरणः-
* आपकी बात बात फूलोंकी
* ये मुलाकात इक बहाना है
13) गालगा गाललगा गाललगा(गागागा)
प्रचलनः गुजराती 0.1, उर्दू 1.5, एकुण 0.9
उदाहरणः
* और क्या एहदे वफा होते है
* जाईए आप कहा जायेंगे
14) गा गाललगा लगालगा गा
प्रचलनः गुजराती -, उर्दू 0.5, एकुण 0.2
उदाहरणः
* तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
* ऐ हैरते आशिकी जगा मत
15) गा गालगाल गागा X 2
प्रचलनः गुजराती 2.2, उर्दू 0.3, एकुण 1.3
उदाहरणः
* आवाज़ दे कहाँ है दुनिया मेरी जवाँ है
* सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा
16) गालगाल गागागा X 2
प्रचलनः गुजराती 0.2, उर्दू 1.1, एकुण 0.7
उदाहरणः
* ज़िंदगी की राहोमें रंजो ग़म के मेले हैं
* तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे
17) गा गाललगा गागा X 2
प्रचलनः गुजराती 0.2, उर्दू 1.5, एकुण 0.3
उदाहरणः
* बचपन की मुहब्बत को दिलसे न भूला देना
* ईन आंखो की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं
18) लगालगा X 4
प्रचलनः गुजराती -, उर्दू -, एकुण -
उदाहरणः
* पुकारता चला हूँ मैं ग़ली ग़ली बहार की
* वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है
19) लल गालगाल गागा X 2
प्रचलनः गुजराती -, उर्दू 0.6, एकुण0.3
उदाहरणः
* रहा ग़र्दिशो में हरदम मेरे ईश्क का सितारा
* ये न थी हमारी किस्मत कि विसाले यार होता
20) गाललगा लगालगा X 2
प्रचलनः गुजराती 1.0, उर्दू 1.5, एकुण 1.2
उदाहरणः
* दिल को है तुमसे प्यार क्यूँ ये न बता सकूंगा मैं
* सोचा था क्या क्या हो गया
सप्तकल वृत्त
21) गालगागा गालगागा गालगा
प्रचलनः गुजराती 4.5, उर्दू 2.8, एकुण 3.6
उदाहरणः
* दिल के अरमाँ आँसुओ में बह गये
* कोई सागर दिलको बहलाता नहीं
22) गालगागा गालगागा गालगागा गालगा
प्रचलनः गुजराती 8.5, उर्दू 10.8, एकुण 9.6
उदाहरणः
* आपकी नज़रों ने समजा प्यार के काबिल मुझे
* तुम गगन के चंद्रमा हो मैं धराकी धूल हूँ
23) गागालगा X 4
प्रचलनः गुजराती -, उर्दू 0.7, एकुण 0.3
उदाहरणः
* हम बेवफा हरग़ीज़ न थे पर हम वफा कर ना सके
* ये दिल ये पागल दिल मेरा क्यूँ बुझ गया, आवारग़ी
24) लगागागा X 4
प्रचलनः गुजराती 11.6, उर्दू 10.8, एकुण 11.2
उदाहरणः
* सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है
* सुहानी चाँदनी रातें हमे सोने नहीं देती
25) लगागागा लगागागा लगागा
प्रचलनः गुजराती 0.8, उर्दू 0.5, एकुण 0.7
उदाहरणः
* मैं अपने आप से घबरा गया हूँ
* मुहब्बत करने वाले कम न होंगे
26) ललगालगा X 4
प्रचलनः गुजराती 0.3, उर्दू 3.1, एकुण 1.7
उदाहरणः
* न किसी की आँखका नूर हूँ न किसी के दिल का क़रार हूँ
* तुझे क्या सुनाउं अय दिलरूबा तेरे सामने मेरा हाल है
अष्टकल वृत्त
27) गा गाललगागा(गागागागा) गागागा X 2
प्रचलनः गुजराती 3.5, उर्दू 0.7, एकुण2.1
उदाहरणः
* सीनें में सुलगते हैं अरमाँ आँख़ोमें उदासी छाई है
* हम छोड़ चले हैं महेफिल को याद आये कभी तो मत रोना
28) गागागागा गागागागा गागागागा गागागा
प्रचलनः गुजराती 0.7, उर्दू 2.6, एकुण 1.6
उदाहरणः
* रातकली ईक ख़्वाबमें आई और गले का हार हुई
* एक था ग़ुल और एक थी बुलबुल
गागागागा ऐवजी गाललगागा चालतं
29) गा गाललगागा गागागा
प्रचलनः गुजराती -, उर्दू -, एकुण -
उदाहरणः
30) गागागागा X 2
प्रचलनः गुजराती -1.2, उर्दू 0.7, एकुण 1.0
उदाहरणः
* अपनी धुन में रहता हूँ (एक गुरु कमी केलेला आहे)
31) लगालगागा X 4
प्रचलनः गुजराती -0.3, उर्दू -, एकुण 0.2
उदाहरणः
* हज़ार बातें कहे ज़माना मेरी वफा पे यकीन रखना
* छुपा लो दिलमें यूँ प्यार मेरा कि जैसे मंदिरमें लौ दिये की
गझलेत लघु-गुरुची सूट कशी घेतातः
उदाहरणांचा नीट अभ्यास केल्यावर कळेल की बरेच गुरू अक्षर लघु म्हणून वापरलेले आहेत. उर्दु आणि गुजराती गझलांमध्ये गणवृत्त वापरतांना काही गुरू अक्षरे लघु म्हणून घेतली जातात.
1) एकाक्षरी गुरू अक्षर लघु म्हणून घेतात.
2) शब्दांती एकाक्षरी गुरू अक्षर लघु म्हणून घेतात.
3) उर्दुत तेरा, मेरा, कोई वगेरे शब्दांचे पहिले अक्षर पण लघु म्हणून घेता येतात.
(ललगालगा X 4)
तुझे क्या बताउं मैं दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है
लल गा लगाल ल गालगा लल गालगा लल गाल गा
(ललगा लगाल गागा X 2)
ये न थी हमारी किस्मत कि विसाले यार होता
ल ल गा लगाल गागा ल लगाल गाल गागा
लघु-गुरु चर्चाः
भाषा शब्दांनी बनलेली आहे व शब्द अक्षरांनी बनलेले आहेत. अक्षरांमध्ये स्वर व स्वराच्या आधाराने उच्चारले जाणारे व्यंजन समाविष्ट असतात. अक्षर हे उच्चारांचे एकक (unit) आहेत. सामान्यतः पद्याच्या लयबद्ध पठनासाठी आणि तालबद्ध गायना- साठी अक्षरांना लघु आणि गुरू अशा दोन वजनामध्ये विभाजित केलेले आहे. भारतीय पिंगळातले गणवृत्त व मात्रावृत्त दोन्ही प्रकारच्या वृत्तांमधे लघु आणि गुरूची विभागणी पायाभूत आहे.
एक लघु अक्षर उच्चारायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा दुप्पट वेळ गुरू अक्षर उच्चारण्यासाठी लागतो. 'काईमोग्राफ' नावाच्या यंत्रावर किंवा रेकाॅर्डिंग साठीच्या कम्प्युटराईज्ड प्रोग्राम द्वारे ध्वनिआंदोलनांना आलेखित करता येतात. त्यांच्या निरीक्षणा वरुन असा निष्कर्ष निघतो कि सामान्यपणे बोलतांना किंवा गद्यवाचनाच्या वेळी लघु व गुरू अक्षरांच्या उच्चाराला लागणा-या वेळाचे प्रमाण 1:2 नसते, पण पद्याच्या पठनात व गायनात हे प्रमाण 1:2 असते.गझलच्या परिभाषेत ह्या प्रमाणाला वजन असे म्हणतात म्हणून गुरू अक्षराचे वजन लघु अक्षराच्या वजनापेक्षा दुप्पट असते असे म्हणतात. गझलच्या वृत्तात दोष आला तर 'मिसरा(ओळ) वजनमें नहीं है' अथवा 'वजन डोलता है' अशी टीप्पणी करण्यात येते.
हे नोंदवायला हवे कि लघु व गुरूची विभागणी नसलेल्या वृत्तांमध्ये मनहर सारख्या वृत्तात संख्यावृत्त समाविष्ट आहेत. ह्या वृत्तांच्या पठनात अक्षर लघु आहे की गुरू आहे ह्याकडे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे गुरू अक्षर लघु करता दुप्पट वेळ घेत नाही. लघु अक्षर लांबवून बोलेले जातात, उदा-
* चुप चुप बैठे हो जरूर कोई बात है
* जाने कहां मेरा जिगर गया जी
(* दिवस तुझे हे फुलायचे)
ह्या प्रकारची काव्यरचना संगीतबद्ध करतांना देखील लघु-गुरू भेद करण्यात येत नाही. ह्या संख्यावृत्तांशिवाय इतर वृत्तांमध्ये लघु-गुरूची विभागणी पायाभूत आहे.
गुजराती व उर्दु गझलची वृत्ते अतिचुस्त मात्रावृत्ते आहेत. गणवृत्तांमधे दोन, तीन, चार किंवा पाच लघु एका पाठोपाठ येतात. गझलच्या वृत्तांमधे, जर स्वतंत्र उच्चार नसेल तर, दोन लघु एकापाठोपाठ येत नाही.
गणवृत्त आपल्या संस्कृत उच्चार प्रणालीला अनुसरतात. त्या प्रमाणे 'क-म-ल','न-य-न' सारख्या शब्दांच्या उच्चाराचे वजन 'ललल' होते, परंतु कालक्रमाने भारतीय उच्चारप्रणालीवर फारसी व अरबी भाषेचा प्रभाव पडल्याने आता 'क-म-ल' च्य ऐवजी 'क-मल्'आणि 'न-यन्'असेच उच्चार प्रचलित असल्याने गझलच्या वृत्तांमधे ह्या शब्दांचे वजन 'लगा' असे होईल. 'करवत' ह्या शब्दाचा क-र-व-त असा 'लललल' वजनाचा उच्चार कुणीच करत नाही, सामान्यतः त्याचा उच्चार कर्-वत् असाच होत असल्याने त्याचे वजन गझलच्या वृत्तांमध्ये 'गागा' असेच घेण्यात येतात.
कमल, नयन, समय, नजर, असर वगेरे तीन लघु अक्षरांमधे शब्दांचे वजन 'लगा' आहे, त्यावरून असा नियम तयार करता येईल की सलग उच्चारले जाणारी दोन लघु अक्षरे, गझलच्या वृत्तांमधे दोन गुरु उच्चाराचे एकक तयार करतात. आता ह्याच शब्दांना 'गाल' वजनात घेण्याचा प्रयास केला तर 'कम-ल', 'नय-न', 'सम-य', 'नज-र', 'अस-र' असा कर्णकटु व दोषयुक्त उच्चार करावा लागतो. म्हणून ह्या शब्दांना 'लगा' वजनातच घ्यावे लागणार. 'गाल' वजनात नाही. ह्या दोषाने प्रभावित एक उदाहरण पाहू-
युद्धकाळी एवढे असवार* कर
प्रथम तुझ्या अहमचा संहार कर -- शोभित देसाई (ह्यांची क्षमा मागून )
(* असवार= घोडेस्वार)
प्रथम ओळ वाचून 'गालगा गागालगा गागालगा' असा लघु-गुरूक्रम असल्याचं कळतं. ह्या वजनात दुसरी ओळ उच्चारली तर 'प्रथम' व 'अहम' दोन्ही शब्द 'गाल' वजनात बसवावे लागतात आणि वृत्त सांभाळायला 'प्रथ-म तुझ्या अह-मचा संहार कर' असे कर्णकटु उच्चार करावे लागतात.
गझलच्या काही वृत्तांमध्ये दोन लघु स्वतंत्र उच्चार एकक म्हणून सुद्धा घेण्यात येतात. दोन लघुंचे स्वतंत्र उच्चार होत असतील अशा शब्दांच्या उदाहरणात 'कविता' व 'अनुभव' हे शब्द आपण घेऊ शकतो. 'क-वि-ता' चे वजन 'ललगा' आणि'अनु-भव' चे वजन 'ललगा' होईल. ह्या शब्दांना 'गागा' म्हणून घेतले तरी पण चालते आणि 'अनु s भव' अशा उच्चारणाने 'लगागा' म्हणून घेतले तरी थोडा उच्चार विकृती दोष स्वीकारून चालण्यासारखे आहे. पण ह्या शब्दांचे श्रेष्ठ वजन 'ललगा'च आहे.
'अविचारी', 'असमान', 'अविभाजित', 'प्रचलित', 'विनियोग', 'नियमित' ह्या सारख्या शब्दांचे पहिले दोन लघु अक्षर एकत्र करून एक गुरु करणे अवघड आहे. ह्या सर्व शब्दांमध्ये प्रथम दोन अक्षरांचा उच्चार स्वतंत्र असल्याने प्रथम दोन अक्षरांसाठी 'लल' वजनच योग्य आहे.
वृत्तांच्या दृष्टिने थोडे जास्त अवघड शब्द पाहिले तर 'अविनयी', 'विकिरणे' वगेरे शब्दांच्या पहिल्या तीन लघुंचा उच्चार स्वतंत्र आहे. ह्या शब्दांचे श्रेष्ठ वजन 'लललगा' असेच होणार; ह्या शब्दांना 'गालगा' कि 'लगागा' वजनात घेणे अवघड आहे. म्हणूनच गझलच्या कोणत्याही प्रचलित वृत्तांमधे ह्यांना समाविष्ट करता येणार नाही.
'बोलवणे' कि 'ऐकवणे' सारख्या शब्दांचे मधले दोन लघु सलग उच्चारित होत असल्याने 'बो-लव-णे' कि 'ऐ-कव-णे'चे वजन 'गागागा' होईल. ह्या शब्दांना 'गाललगा' मापात कधी घेता येणार नाही. त्या उलट 'दंतकथा' व 'लोककला' सारख्या शब्दांच्या दोन्ही लघुंचा उच्चार स्वतंत्र असल्याने त्यांचा 'दं-तक-था' किंवा 'लो-कक-ला' असा उच्चार करून त्यांचे वजन 'गागागा' घेता येणार नाही, त्यांचे खरे वजन 'गाल लगा' असेच होईल. गझलच्या ब-याच वृत्तांमधे दोन स्वतंत्र लघु सलग येतात, ह्या लघुंना गोठवण्यात कविच्या वृत्तकौशल्याची कसोटी होते. दोन सलग येणा-या लघुंचा उच्चार एक एकक म्हणून होत असेल, अर्थात् दोन लघु मिळून एक च श्रुति बनवत असले (उदा. कर, जय, वर) तर त्यांना 'गा' वजनात च घ्यावे लागणार, 'लल' वजन अयोग्य ठरणार. जर दोन सलग येणा-या लघुंचा उच्चार स्वतंत्र असेल, अर्थात् दोन लघुंच्या एकुण दोन श्रुति होत असतील तरच त्यांना 'लल' वजनात घेता येतील. एक साधा नियम असा ठरवता येईल की दोन सलग येणा-या लघुंपैकी पहिला 'अकारान्त' असला आणि दुसरा -हस्व 'इ' किंवा 'उ' स्वरान्त असला तर त्यांचे उच्चार स्वतंत्र राहतात, उदा.- 'यदि', 'कवि', 'कटु', 'लघु'
गझलच्या काही वृत्तांमधे, मुख्यतः षट्कल वृतांमध्ये, शेवटचे आवर्तन 'गाललगा' असेल तर विकल्पाने 'गागागा' वापरता येते. शेराच्या एका ओळीचे शेवटचे आवर्तन 'गाललगा' असले आणि दुस-या ओळीचे शेवटचे आवर्तन 'गागागा' असले, तर ते मान्य आहे. परंतु ही सुट फक्त शेवटच्या आवर्तनातच घेता येते, ये लक्षात ठेवायला हवे.
'तिमिरघन' शब्द 'लगागा' वजनातच घेऊ शकतो. (ति-मिर-घन) ह्या शब्दाला 'गालगा' किंवा 'गागाल' वजनात घेतले तर "तिमि-र-घन" किव्हा 'तिमि-रघ-न' असा चुकीचा उच्चार करावा लागेल. 'भटकणे'किंवा 'बिनसणे' ह्या शब्दांचे खरे वजन 'लगागा' असेच होईल. जर 'गालगा' वजनात घेतले तर 'भट-क-णे' व 'बिन-स-णे' असे अस्वीकार्य उच्चार करावे लागतील.
'दिवस' शब्द 'दि-वस' असाच उच्चारला जात असल्याने 'लगा' वजनात येईल, परंतु 'दिवसात' चा उच्चार 'दि-व-सा-त' होत असल्याने 'ललगाल' माप श्रेष्ठ ठरेल, विकल्पाने थोड्या शैथिल्या बरोबर 'गागाल' माप पण स्वीकारु शकतो, परंतु 'गालगा' वजन घेतले तर 'दि'चा उच्चार लांबवावा लागतो, जो स्वीकार्य नाही.
'अर्थ', 'हस्त', 'मित्र', 'रक्त', 'चित्त', 'लग्न', 'तुच्छ', 'बुद्ध', 'भिन्न', 'विप्र' सारख्या शब्दांमध्ये पहिले अक्षर लघु असूनही त्या अक्षरानंतर येणा-या संयुक्त व्यंजनाचा आघात पडल्याने प्रथम अक्षर गुरू मानल्या जाते. लिपीत जरी जोडाक्षर दुस-या अक्षराला जोडलेले दिसत असले तरी उच्चारात त्याचे वजन पहिल्या अक्षराकडे झुकलेले असल्याने ह्या तमाम शब्दांचे वजन 'गाल' असेच घ्यावे लागणार. अक्षर व यज्ञ सारख्या शब्दांचे लिपीनुसार दिसणारे वजन अनुक्रमाने 'लगा' व 'गा' चुकीचे आहेत. उच्चारांच्या आधाराने ह्या शब्दांचे वजन अनुक्रमाने 'गागा' (अक्-शर) व 'गाल' (यद्-न्य) असे होईल.
''क्षणिक' शब्दात 'क्ष' लघुच मानला जाईल, म्हणून त्याचे वजन 'लगा' होईल. 'युद्धक्षेत्र' सारख्या शब्दात 'क्ष' अक्षर मध्यभागी येत असल्याने आणि हा सामासिक शब्द असल्यामुळे 'द्ध' वर 'क्ष'चा आघात पडत नाही म्हणून त्याचे वजन 'गालगाल' होईल, 'गागागाल' असे होणार नाही. 'अमृत' शब्दात 'म'चा आघात पडल्याने 'अ' गुरु होतो आणि त्याचे वजन 'गागा' होईल.
ब-या, वह्या सारख्या जोडाक्षरांमध्ये उच्चारणात 'ब' आणि 'व' ह्या अक्षरांवर आघात पडत नाही. जर कुणी 'बर्- या' 'वह्- या' असे उच्चार केले, तर ते चुकीचे ठरतील. हे सर्व निर्बल संयोगाचे उदाहरण आहे. त्यांचे वजन 'लगा' होईल, 'गागा' होणार नाही.
'पुण्यात' (पुणे शहरात) व 'पुण्यात' (सत्कर्माच्या परिणामात/फलात) काय फरक आहे? हे दोन शब्द लिहिण्यात थोडापण फरक नसला तरीही पहिला शब्द बोलताना 'ण्' चे आघात अगोदरच्या 'पु' अक्षरावर पडत नसल्याने हा निर्बल संयोग आहे.त्याचा उच्चार 'पु-ण्या-त' व त्याचे वजन 'लगाल' असे होईल पण दुस-या शब्दाच्या उच्चारणात 'ण्' चा आघात आधीच्या 'पु' अक्षरावर पडल्याने त्याचा उच्चार 'पुण् - या-त' असा होतो आणि त्याचे वजन 'गागाल' असे होते.
'अंत', 'अंश', 'संप', 'कंस', 'दंड' सारख्या शब्दातील अनुस्वार उच्चारणात प्रथम अक्षर गुरू होते.पण 'हुंकार'(हिन्दी शब्द) 'मिंया', 'कुँवारा' सारख्या शब्दांचे अनुस्वार कोमल असल्याने प्रथम अक्षर गुरू न होता लघुच राहते.
__________________________________________________
surekh lekh!
उत्तर द्याहटवाआनंदयात्री, धन्यवाद!
हटवा