_______अच्छे अल्फाज ...किसी भी मौसिकी के ...मोहताज नही होते________ "वैराळकरजी,निवडक ७-८ गझलकारांचा दोन तासांचा मराठी गझल मुशायरा पणजी येथे आयोजित करायचा,जमेल?"
गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक गझलकारा राधा भावे यांचा फोन...सहकारी मंडळींशी बोलून होकार दिला.दुस-या दिवशी पुन्हा फोन,"मुशाय-याला नाव काय द्यावे ?....वैभव जोशी,ममता,सुधीर शी बोललो..."गझलरंग"कळवून टाकले..लगेच पुन्हा फोन,"आयोजक संस्थेचे नाव?"....
        अशा रितीने,सुरेश भट गझलमंच'आणि,'गझलरंग'या दोन गझलसंज्ञा अस्तित्वात आल्या...
 स्थापना आणि शुभारंभ मुशायरा दिनांक-२९ एप्रील २०१२...ठिकाण-गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाचे टुमदार देखणे सभागृह,पणजी.
 गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत 'गझलरंग' एकूण सत्तावीस मुशायरे झालेत.पणजीत दोन,मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आठ आणि एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे सतरा.यापैकी एक फक्त महिला गझलकारांचा आणि एक उर्दू-मराठी मिला-जुला...शहरी,ग्रामीण,वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रातल्या अठ्ठेचाळीस गझलकारांनी या मंचावरून सादरीकरण केले.विशेष म्हणजे त्यापैकी पस्तीस गझलकार वय वर्षे २५ते४० या वयोगटातले.पुढच्या आठ मुशाय-यांचे वेळापत्रक तयार आहे.खच्चून भरलेल्या प्रेक्षागृहात प्रसंगी खाली जमिनीवर बसून उसळून-उसळून दाद देणारे रसिक हे आमचे ऊर्जास्थान.मुंबईच्या URL फाऊंडेशनचे उदयदादा लाड आणि स्वतःचे नाव जाहीर न करण्याचे कडक बंधन घातलेले काही मित्र यांची साथ हे आमचे संचित.
या दमदार वाटचालीत बरीच तथ्ये सामोरी आली.अनेक खरे-खोटे चेहरे वाचता आले.पण दोन उल्लेखनीय बाबी:

1.

महाराष्ट्रातील तरूण पिढी अत्यंत जबाबदारीने,सातत्याने दमदार अस्सल,सकस,निर्दोष गझल लिहित आहे.

2.

"गायक गाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणतो म्हणून हे गझलकार लोकांना माहीत होतात,आम्ही यांना मोठे करतो"अशा स्वरुपाची दर्पोक्ती एका स्वयंघोषित पंडित गायकाने काही वर्षांपूर्वी केली होती.ती किती पोकळ होती याचा अनुभव आला.
जवळ जवळ प्रत्येक महिन्यात पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात 'गझलरंग' मुशायरा सादर केला जातो.सहा वाजता एकही खुर्ची रिकामी नसते.नंतर आलेले सुमारे१००-१५० रसिक दोन रांगांच्या मध्ये खाली बसून असतात.टाळ्या,शिट्यांची बरसात सुरू असते.कुठल्याही वाद्याची अथवा कथित कमावलेल्या-गमावलेल्या पंडिती गळ्याची साथ नसते.अगदी तरन्नुम मध्ये सुद्धा सादरीकरण न करण्याचे बंधन काटेकोरपणे पाळले जाते.
कधीतरी एका जाणकार रसिकमित्राने नोंदविलेल्या वैश्विक सत्याची अनुभूती प्रत्येक मुशायरा देऊन जातो.तो म्हणाला होता-

"अच्छे अल्फाज किसी भी मौसिकी के मोहताज नही होते ।"...

 

४ टिप्पण्या:

 1. अण्णा...सुरेश भटसाहेबांनी लावलेल्या मराठी रोपट्याला,ह्या रोपट्यास प्रेमळ हाताने गोंजारणार्या आपणसारख्यांना आणि आपल्या शब्दसामर्थ्याचं खतपाणी देणार्या तमाम मराठी गझलकारांना मानाचा मुजरा... ____/!\____

  उत्तर द्याहटवा
 2. अण्णा,
  दोनच वर्षांपूर्वीच्या एका अचानक घडलेल्या कार्यक्रमाला चळवळीचं स्वरूप देत आपण नव्या उमेदीच्या अनेक समर्थ रचनाकारांना आपण गझलरंगचा मंच उपलब्ध करून दिलाय, हा खरोखरच मराठी काव्यधारेवर मोठा उपकारच आहे. कविवर्य सुरेश भट यांना स्वत:च्या गझलांच्या सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम केले... आजही क्वचित कोणी रचनाकार आपापल्या रचना एकट्यानं सादर करण्याचा प्रयत्न करत असतो.... पण ताज्या दमाच्या अनेक रचनाकारांना एक सशक्त मंच देऊन रसिकांसमोर येण्याची संधी सातत्यानं मिळतेय ही खरोखर आगळीवेगळी बाब आहे.
  यामागची आपली भावना आणि केली जाणारी मेहनत, दोन्हीही आदरास पात्र आहेत.

  उत्तर द्याहटवा
 3. अश्या एका कार्यक्रमाला उपस्थित होतो जेव्हा राऊतसरांना पुरस्कृत करण्यात आले होते. खुप छान कार्यक्रम होता. "अच्छे अल्फाज़ मौसिकी के महोताज नहीं होते" त्याहून पुढे जाऊन हे सांगायची ईच्छा होते की "मौसिकी बहरमें लिख़े हुए अल्फाज़ की महोताज होती है"

  उत्तर द्याहटवा