'गझलकार' सीमोल्लंघन विशेषांकाच्या आवाहनाला
या वर्षी आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला;
तो अभूतपूर्वच म्हटला पाहिजे.
अगदी आज सकाळपर्यंत मेलवर,व्हाॅटस् अॅपवर
गझलांचा ओघ सुरूच होता.
गझला उशिरा मिळाल्याने
अनेक मित्रांच्या गझलांचा समावेश
अंकात करता आला नाही;ह्याची खंत आहे.
काही मित्रांनी मेल करताना गझलांच्या फोटो इमेजेस
पाठविल्या असल्याने त्यांचाही उपयोग करता आला नाही.
त्याबद्दल दिलगीर आहे.
हेमंत पुणेकरांनी केलेले मराठी गझलांचे गुजराती अनुवाद
हे या अंकांचे वैशिष्टय ठरावे.
हे या अंकांचे वैशिष्टय ठरावे.
जनार्दन केशव ह्यांची पन्नास शेरांची मेगा गझल ही
या अंकाची खासियत.
गझल स्फुरण्याची निमित्ते कालांतराने गळून पडतात
आणि मागे उरते ते त्या गझलमधून विविध वृत्ती-प्रवृत्तीवरील
काव्यात्म भाष्य;
स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडणारे!
तसेच काहीसे जनार्दन केशव ह्यांच्या गझलचे व्हावे.
झाले नाही तरी एकाचवेळी बावन्न काफिये
ह्या गझलेने दिलेले आहेतच.
ते संदर्भासाठी नवोदितांना ह्या अंकात उपलब्ध आहेत.
ह्यावेळी गझलकारांचा क्रम
त्यांच्या नावानुसार आकारविल्हे-अल्फाबेटिकली
लागलेला आहे.
अंकातील गझलांच्या निमित्ताने
एक टीपण आणखी लिहून
अंकात समाविष्ट करण्याचा मानस आहे.
आपल्या सुरेख चित्रांची अनुमती दिल्याबद्दल
कलाश्री बर्वे यांचे हार्दिक आभार.
आपल्या सुरेख चित्रांची अनुमती दिल्याबद्दल
कलाश्री बर्वे यांचे हार्दिक आभार.
सर्व गझलकारांना,वाचकांना
सीमोल्लंघनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-श्रीकृष्ण राऊत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा