______________वो जो हममे तुममे करार था______सुधाकर कदम____________

 Sudhakar Kadam

         गझलसह कोणत्याही काव्याचे माध्यम शब्द,छंद,वृत्त,अलंकार वगैरे वगैरे आहे असे मानल्या जाते.या माध्यमांची विशेषता ही आहे,की यांना कोणताही बाह्याआधार नाही.हे सगळे आपल्या आत उसळत असतात.दुसरी विशेषता ही आहे,की या द्वारे उत्तम भावाभिव्यक्ती होऊ शकते.भाव हा एक शब्द असा आहे की जो विचार,वेदना (Feeiling) आणि अभिवृत्ती (Attitude) याचा द्योतक आहे.तिसरी विशेषता म्हणजे यातून सुक्ष्म भाव सुद्धा व्यक्त करता येतात.चौथी विशेषता ही आहे, की यात संदिग्धता आणि अस्पष्टता फारच कमी असते.तरी पण अंतर्मनातील भाव या माध्यमातून पूर्ण रुपाने व्यक्त होत नाही,असे माझे मत आहे.

          आता आपण संगीताचा विचार करु...संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे ’काकु’.काकु हा शब्द ’के’ धातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे ’लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात.

          एवढी मोठी प्रस्तावना करण्याचं कारण आजची आपली मोमिन खाँ मोमिन यांची ’वो जो हममे तुममे करार था...’ ही गझल आहे.ही गझल बेगम अख्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलामली,मधुरानी,चित्रासिंग,पंकज उधास,अहमद-महमद हुसैन,पिनाज़ मसानी,शफ़ाक़तअली खान,आबेदा परवीन पासून तर आताच्या जोजो मुखर्जी पर्यंत सगळ्यांनी ही गझल गायिली आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर गायिल्या जाण्याचं भाग्य दुसर्‌या कोणत्या गझलला मिळालं असेल असं मला वाटत नाही.(या गझलचे ’पॉप’ (की पाप ?) ही शज़ाद रॉयने केले आहे.)वरील सर्व गायक-गायिका आपापल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहेत.त्यांचे विचार,सादरीकरण,सुरावट वगैरे वगैरे त्यांच्या परीने उत्कृष्टच आहे,यात काहीच वाद नाही.तरी पण ’काकु’ चा विचार केला असता मला मधुरानीने गायिलेली ही गझल जास्ती भावली आहे. ही बंदिश ’तोडी’ रागात आहे.या अगोदर आपण ’मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही जगजित-चित्रासिंग यांनी गायिलेली गझल ऐकलेली आहे.ती सुद्धा तोडी रागातच होती,त्यामुळे मी रागाच्या तपशिलात शिरत नाही.

          मधुरानीच्या आवाजात,गायनात आणि सादरीकरणात एक वेगळेपणा आहे.तो ऐकणार्‌याला सहजपणे आपलंसं करून घेतो.शब्द-स्वरांशी लडीवाळ खेळ करण्याची त्यांची पद्धत किंवा शैली म्हणा,आपल्यालाही ’तो’ लडीवाळपणा जाणवेल अशा प्रकाररे ’लाडावत’ नेतो.असे शब्द-स्वरांचे लाड करत-करत कुरवाळत गाणे फार कमी गायकांना जमते.खालील गझल ऐकतांना आपणास हे निश्चितच जाणवेल.गझलची सुरवातच अतिशय आर्जवपूर्वक लाडिकपणे होते.त्यातील मंद्र सप्तकातील ’निषाद’ स्पष्टपणे दाखवून,दुसरी ओळ अलवारपणे आपल्या समोर येते...तेव्हा ऐकतच राहावेसे वाटते...तसेच प्रत्येक शेरातील ’पंचम’ स्वर सुद्धा आपण कोणीतरी खास पाहुणे असल्याच्या थाटात येऊन,आपले अस्तित्व प्रकर्षाने दाखवून देतो. संगीतकार आणि गायिका म्हणून मधुरानीला खरोखरच महान मानावे लागेल,असे मला वाटते...

          या गझलचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे सर्व गायकांनी तिला ’रूपक’ या सात मात्राच्या तालामध्ये बांधले आहे.याचा अर्थ असा की दुसर्‌या तालात तिची बांधणीच होऊ शकत नाही,असे यातून सूचित होते.आणि कोणी बांधण्याचा प्रयत्न केला तर रसभंग होण्याची शक्यता जास्ती आहे.इतर अनेक गझला प्रत्येक गायकाने आपापल्या वकूबाप्रमाणे वेगवेगळ्या तालात बांधून सादर केल्या,परंतू ही गझल सगळ्यांना अपवाद ठरली आहे.

          मधुरानी नंतर मला आवडलेली गायिका आहे ’नैय्यरा नूर’....तिचे ’सादगीभरे’ सादरीकरण काळजाला भिडतेच ! याचा अर्थ इतरांनी चांगले गायिले नाही असा आपण घेवू नये.आवडण्याचे स्वातंत्र्य नेहमीच ऐकणार्‌याला असते..... येथे मधुरानी चा VDO टाकला आहे.नैय्यरा नूर सह इतर वर उल्लेख केलेल्या सर्व गायकांचे VDO  www.gazalgazal.blogspot.com या blog वर आपणास ऐकता,बघता येईल.


                             

’वो जो हममे तुममे क़रार था...’

 वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो के न याद हो
वही यानी वादा निबाह का तुम्हें याद हो के न याद हो

वो नये गिले वो शिकायतें वो मज़े-मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो के न याद हो

कोई बात ऐसी अगर हुई जो तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयाँ से पहले ही भूलना तुम्हें याद हो के न याद हो

सुनो ज़िक्र है कई साल का, कोई वादा मुझ से था आप का
वो निबाहने का तो ज़िक्र क्या, तुम्हें याद हो के न याद हो

कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो के न याद हो

हुए इत्तेफ़ाक़ से गर बहम, वो वफ़ा जताने को दम-ब-दम
गिला-ए-मलामत-ए-अर्क़बा, तुम्हें याद हो के न याद हो

वो जो लुत्फ़ मुझ पे थे पेश्तर, वो करम के था मेरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा-ज़रा, तुम्हें याद हो के न याद हो

कभी बैठे सब में जो रू-ब-रू तो इशारतों ही से गुफ़्तगू
वो बयान शौक़ का बरमला तुम्हें याद हो के न याद हो

किया बात मैं ने वो कोठे की, मेरे दिल से साफ़ उतर गई
तो कहा के जाने मेरी बाला, तुम्हें याद हो के न याद हो

वो बिगड़ना वस्ल की रात का, वो न मानना किसी बात का
वो नहीं-नहीं की हर आन अदा, तुम्हें याद हो के न याद हो

जिसे आप गिनते थे आशना जिसे आप कहते थे बावफ़ा
मैं वही हूँ “मोमिन”-ए-मुब्तला तुम्हें याद हो के न याद हो

-मोमिन खाँ मोमिन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा