1.
घर, गाव आठवून उसासून झोपलो घर, गाम स्मरतो, आंख नितारीने सुई गयो
अंधार काळजास लपेटून झोपलो अंधारुं काळजाने लपेटीने सुई गयो
स्वप्ने पुन्हा नवीन उशाजवळ घेतली स्वप्नो फरी नवीन लीधा ओशिकां नजीक
इच्छा जुन्या मनात उगाळून झोपलो ईच्छाओ जूनी मनमां लसोटीने सुई गयो
गप्पा करीत भूक कितीवेळ जागली वातोना बहाने भूख क्यां लग जागती रही
मग मी खिसे उगाच तपासून झोपलो आम ज पछी हुं खिस्सा तपासीने सुई गयो
एकांत पांघरून कुठे नीज लागते एकांत ओढवाथी कदी ऊंघ लागे कंई?
मी दुष्ट आठवांस दटावून झोपलो हुं सघळी दुष्ट यादोने दाटीने सुई गयो
जे थापटायचे, न अता हात राहिले थाबडता’ता जे हाथ हवे ए नथी रह्या
शहाण्या मुलासमान स्वत:हून झोपलो हुं डाह्यो डमरो खुदने मनावीने सुई गयो
पोलीस मार देत विचारीत राहिला पोलीस मार मारतो पूछतो रह्यो बस ए ज
फुटपाथवर कुणास विचारून झोपलो फुटपाथ पर हुं कोने पूछीने सुई गयो?
जेथून उठवणार कधी ना कुणी मला ज्यांथी नही उठाडे कदी कोई पण मने
थडग्यात मी अखेर सुखावून झोपलो अंते कबरनुं सुख ए स्वीकारीने सुई गयो
- शुभानन चिंचकर – अनुवाद. हेमंत पुणेकर
2.
पायांशी आला होता धावून फुलांचा रस्ता कदमोनी नजीक आव्यो’तो दोडीने फूलोनो रस्तो
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता हुं केफमां तारा आव्यो टाळीने फूलोनो रस्तो
चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही ज्यां चालवा तारी साथे प्रियकरने समय ना मळतो
तू काय मिळविले आहे मिळवून फुलांचा रस्ता ते मेळव्युं छे शुं कहे ने पामीने फूलोनो रस्तो
बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला वरसीने तुज अंग ऊपर, वरसाद सुगंधी थयो छे
अन् गंध स्वताचा गेला विसरुन फुलांचा रस्ता ने बेठो स्वयंनी खुश्बु भूलीने फूलोनो रस्तो
या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी आ जन्मे ओळख तारी नहि थाय कदी कांटा संग
आलीस कपाळा वरती गोंदून फुलांचा रस्ता लावी छे ललाट ऊपर तुं छापीने फूलोनो रस्तो
ते वेड तुझ्या प्रितीचे ती ओढ तुझ्या भेटीची ए घेलछा तुज प्रीतीनी, ए तारा मिलननुं खेंचाण
आगीतून चालत आलो समजून फुलांचा रस्ता हुं आगमां चाली आव्यो समजीने फूलोनो रस्तो
संभाळ स्वताला थोडे हे रडणे थांबव आता संभाळ जरी पोताने आ रडवुं हवे रोकी ले
जाईल तुझ्या अश्रूंनी वाहून फुलांचा रस्ता आंसु तुज लई ना जाये ताणीने फूलोनो रस्तो
हाताला देऊन हिसका ते दिवस पळाले मागे मुज हाथने झटको दईने ए दिवसो भाग्या पाछळ
अन् पायाखालुन गेला निसटून फुलांचा रस्ता ने पग नीचेथी गयो छे छटकीने फूलोनो रस्तो
- वैभव देशमुख – अनुवाद हेमंत पुणेकर
3.
पापण्यांनी खोल केले वार तू; ज्यां करे पांपणथी ऊंडा वार तुं;
सात माझे जन्म केले ठार तू. सात मारा जन्म मारे ठार तुं.
मोहराया लागता काया तुझी; महोरवा लागी ज्यां तुज काया सखी
यौवनाचे मानले आभार तू. माने छे यौवन तणो आभार तुं
ह्या फुलांनी मान खाली घातली; आ फूलोए शीश झुकावी लीधुं
कोणता केला असा शृंगार तू? एवो तो शानो करे शृंगार तुं?
सर्व साच्यातून गेलो येथल्या; सर्व बीबांमां ढळी जोयुं अहीं
जीवनाला दे नवा आकार तू. जिंदगीने दे नवो आकार तुं.
काल जेव्हा तोल जाऊ लागला; ज्यारे मारी ओर ढळवा लागे छे
लाजण्याचा घेतला आधार तू. लाजवानो ले छे बस आधार तुं.
हासुनी तू प्राण माझा घेतला; प्राण मारा लई लीधा एक स्मितथी
चुंबुनी केले किती सत्कार तू! ने करे चुंबनथी कंई सत्कार तुं!
- श्रीकृष्ण राऊत – अनुवाद- हेमंत पुणेकर
4.
श्वास माझा अता मोकळा वाटतो श्वास मारो हवे मोकळो लागे छे
हा हवेचा नवा सापळा वाटतो… आ हवानो नवो कारसो लागे छे…
रंग आताच सांडू नको ना फुला रंग हमणा ज सौ ढोळी ना दे कळी
देठ थोडा तुझा कोवळा वाटतो… कोई चूंटी न ले, डर घणो लागे छे…
रोज अंगावरी चांदणे सांडते रोज ढोळाय छे अंग पर चांदनी
वेष माझा जरी बावळा वाटतो… वेश छो मारो बावळ समो लागे छे…
दोन चिमण्यात हे बोलणे चालले वात बे चकलीओमां आ चाली रही
आज माणूसही कावळा वाटतो… मानवी पण हवे कागडो लागे छे…
सोडता मी तुझा हात हातातुनी हाथ तारो हुं छोडी दऊं जे घडी
जन्म माझा मला पांगळा वाटतो… जन्म मारो मने पांगळो लागे छे…
- सतीश दराडे – अनुवाद – हेमंत पुणेकर
5.
राख नाही, ना कुठेही धूर थोडासा राख नहि, ना कशे पण धूम जराक
काळजाचा पेटला कापूर थोडासा.. काळजानुं बळ्युं कर्पूर जराक…
भूतकाळाची उजळणी चालली आहे, वीत्या वर्षोने हुं वागोळुं छुं,
दाटला आहे सुखाने ऊर थोडासा! ने भराई आव्युं छे आ उर जराक!
वाहतो आहेस तू रक्तातूनी माझ्या, मारां लोहीमां वहे छे तुं छतां,
का तरीही वाटशी तू दूर थोडासा? केम लागे छे मने दूर जराक?
तू दिलेली सोडचिठ्ठी हरवली आता- गुम ते आपेली छूटाछेडानी प्रत-
राहिला लक्षात पण मजकूर थोडासा.. पण हजु याद छे मजकूर जराक…
थेट लोटांगण अताशा घेत नाही मी, कोईना पगमां नथी पडतो हवे,
खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा.. खोतरी जोउं छुं सिंदूर जराक…
सांत्वनाची फार घाई चांगली नाही, बहु उतावळ नहि कर सांत्वननी,
ओसरूदे भावनेचा पूर थोडासा… सरवा दे लागणीनुं पूर जराक…
- ज्ञानेश पाटिल – अनुवाद – हेमंत पुणेकर
6.
एकटा सागरकिनारा एकटा एकलो सागरकिनारो एकलो
जन्म ओसरणार सारा एकटा जन्म ओसरवानो आखो एकलो
केवढे अब्जावधी तारे नभी केटला अबजो छे तारा आभमां
वेगळा प्रत्येक तारा एकटा वेगळो प्रत्येक तारो एकलो
सांग ना देणार कुठवर सावली? बोल क्यां लग आपवानो छांयडो
मेघ तो उंडारणारा एकटा मेघ ए लहेरातो फरतो एकलो
काढली झापड तसे कळले मला डाबला काढ्या तो समजायुं मने
मीच नाही धावणारा एकटा हुं नथी अहि दोडनारो एकलो
पांगला मोर्चा, तरी वेडा तिथे मोरचो वीखरायो पण गांडो हजु
देत आहे क्षीण नारा एकटा आपे छे त्यां क्षीण नारो एकलो
धावणारे धावले झुंडीमध्ये दोडनारा दोडता’ता झुंडमां
चालला तो चालणारा एकटा चालतो’तो चालनारो एकलो
कण्हत आहे कोण गाभाऱ्यामधे? कोण कणसे छे गभारामां जुओ
पोरका, अगतिक, बिचारा, एकटा… साव अनाथ अगतिक बीचारो एकलो
- चित्तरंजन भट – अनुवाद – हेमंत पुणेकर
7.
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे चूक्यो दिशा छतांपण छूट्या नथी सहारा
वेड्या मुशाफिराला सामेल सर्व तारे पागल प्रवासीने पण आपे छे साथ तारा
मी चालतो अखंड चालायचे म्हणून बस चालवाने खातर चाल्या करुं निरंतर
धूंदीत या गतीच्या सारेच पंथ न्यारे आ धूनमां गतिनी सौ पंथ लागे प्यारा
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे डरता जे आंधीओथी, सौ ध्रुवना ए गुलामो
हे शीड तोडलेकी अनुकूल सर्व वारे सढ तोडताज लागे, पवनो बधाय सारा
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा मगरूर भाग्यनो ज्यां नकशो में फाडी नाख्यो
विझले तीथेच सारे ते मागचे इशारे बस त्यांज होलवाया, सौ पाछला इशारा
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे चूक्यो दिशा छतांपण आकाश एनुं ए छे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे ए जाणनारने ना नडता कोई उतारा
आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे आशा समी निराशा ए श्रेय सावधोनुं
बेसावधास कैसे डसणार हे निखारे? सावध नथी जे एने क्यांथी डसे तिखारा?
- विंदा करंदीकर – अनुवाद – हेमंत पुणेकर
8.
मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे मलमली यौवन आ मारुं तुं सवारे ओढजे
मोकळ्या केसात माझ्या तु जीवाला गुंतवावे मारा खुल्ला केशमां तुं खुदने खोई बेसजे
लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही लागता ठंडी गुलाबी लखलखु आव्युं हो एम
राजसा माझ्यात तू अन मी तुझ्यामाजी भिनावे ओगळुं तारामां हुं, तुं मुजमां ओगळतो जजे
कापर्या माझ्या तनूची तार झंकारून जावी कंपता मारा आ तनना तार झंकृत थाय एम
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तु पेटवावे रेशमी स्पर्शो वडे संगीतना सूर छेडजे
रे तुला बाहुत माझ्या, रूपगंधा जाग यावी मारी बाहोमां सवारे जागजे मारा सखा
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे हुं जगाडुं सहेज त्यारे तुं मने वळगी जजे
- सुरेश भट – अनुवाद – हेमंत पुणेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा