दु:ख आहे जगात या;
सत्य हे जीवनात या.
माणसे भेटती अता;
मानवी मुखवट्यात या.
चेहरा सुंदर दिसतो;
नेहमी आरशात या.
कोण मेले घराजवळ?
वाचले पेपरात या.
भोवताली उजेड, पण;
तिमिर उरला मनात या!
_______________________________________________
मिलिंद हिवराळे
सादिक नगर, मु. पो. ता. बार्शिटाकळी, जि. अकोला- ४४४४०१
ईमेल: milindhiwarale@yahoo.com
भ्र.: ९४२३६०१३२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा