मिलिंद हिवराळे___एक गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मिलिंद हिवराळे___एक गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

___________________मिलिंद हिवराळे___एक गझल__________________


दु:ख आहे जगात या;
सत्य हे जीवनात या.

माणसे भेटती अता;
मानवी मुखवट्यात या.

चेहरा सुंदर दिसतो;
नेहमी आरशात या.

कोण मेले घराजवळ?
वाचले पेपरात या.

भोवताली उजेड, पण;
तिमिर उरला मनात या!

_______________________________________________
 मिलिंद हिवराळे
सादिक नगर, मु. पो. ता. बार्शिटाकळी, जि. अकोला- ४४४४०१
ईमेल: milindhiwarale@yahoo.com
भ्र.: ९४२३६०१३२०